राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आरोग्य भारती बेळगाव आणि खानापूर शाखेच्या वतीने खानापूर, हलशी, बीडी आणि परिसरातील ज्येष्ठ डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला. १९८०-९० च्या दशकात दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. सुधीर नाईक, डॉ. शिवाजी के. पाटील आणि डॉ. व्ही. एस. जावळी यांचा हलशी येथे सन्मान करण्यात आला.


हलशी येथील डॉ. सुधीर नाईक यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. सौ. हेमा अंबेवाडीकर आणि सौ. माया कोष्टी यांच्या हस्ते धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बेळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. या प्रसंगी ज्येष्ठ डॉक्टरांनी मर्यादित साधनसामग्रीच्या काळात कठीण परिस्थितीत केलेल्या रुग्णसेवेचे अनुभव विशद केले.

“आरोग्य भारती ही ‘स्वस्थ समाज’ हे मूलभूत ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत आहे. दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा नसताना या डॉक्टरांनी दिलेले योगदान आणि केलेली निस्वार्थी सेवा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे,” असे आरोग्य भारती कर्नाटक उत्तर प्रांताचे उपाध्यक्ष वासुदेव इनामदार यांनी म्हटले.
या कार्यक्रमाला आरोग्य भारती बेळगाव आणि खानापूर शाखेचे पदाधिकारी, सदस्य, विविध मान्यवर आदी उपस्थित होते.


Recent Comments