Khanapur

खानापूरच्या प्रसाद पाटील यांचा केएलईकडून गौरव

Share

राष्ट्रीय वैद्यकीय दिनाचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि काँग्रेस नेते प्रसाद पाटील यांचा केएलई संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र जनतेची सेवा केली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी धावून जात त्यांनी आजवर १५ हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. तसेच स्वतः ३३ हून अधिक वेळा रक्तदान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या याच निस्वार्थी आणि मानवी सेवेचा गौरव करण्यासाठी केएलई रुग्णालय आणि संस्थेच्या वतीने राष्ट्रीय वैद्यकीय दिनाच्या मुख्य व्यासपीठावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रसाद पाटील यांच्या निरंतर समाजसेवेचे कौतुक केले.

या सोहळ्याला केएलई संस्थेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: