Khanapur

डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडून राहुल गांधी यांना दिवाळीच्या शुभेच्छा

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गांधी कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. या भेटीचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

नवी दिल्लीतील ५, सुनेहरी रोड येथील निवासस्थानी काँग्रेस परिवारातील नेत्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी मिलन – हाय टी’ कार्यक्रमात डॉ. अंजली निंबाळकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपले आवडते नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. राजकारण आणि कामाच्या पलीकडे जाऊन गांधी कुटुंबीयांसोबत आपुलकीने संवाद साधत सणाच्या शुभेच्छा देण्याचा हा क्षण आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा होता, अशी भावना डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Tags: