Khanapur

खानापूरमध्ये पात्र लाभार्थ्यांना वाहनांचे वितरण; आमदार विठ्ठल हलगेकर यांचा पुढाकार

Share

खानापूर तालुक्यातील गांधीनगर आणि लिंगनमठ येथील लाभार्थ्यांना महामंडळाच्या विविध योजनांतर्गत मंजूर झालेल्या वाहनांचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते पूजन करून वितरण करण्यात आले.

मतदारसंघातील पात्र कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आमदारांनी सहकार्य केले आहे.

खानापूर तालुक्यातील गांधीनगर आणि लिंगनमठ गावांमध्ये महामंडळाच्या विविध योजनांतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी वाहनांचे पूजन करून ती अधिकृतपणे सुपूर्द केली. मतदारसंघातील गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदारांनी विशेष प्रयत्न केले. वाहनांचा लाभ मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, शासनाच्या महामंडळांच्या विविध योजनांचे लाभ तळागाळातील पात्र नागरिकांपर्यंत थेट पोहोचत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या वाहनांमुळे लाभार्थ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल आणि स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Tags: