दिवाळीचा सण जवळ आल्याने बेळगावच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि खडेबाजार परिसर ग्राहकांनी फुलून गेले असून, गोवा आणि कोकणातूनही नागरिक खरेदीसाठी बेळगावात दाखल होत आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावातील प्रसिद्ध पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि खडेबाजार परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागासह शेजारील कोकण परिसर तसेच गोवा राज्यातूनही हजारो नागरिक खरेदीसाठी येत आहेत. कपडे, दागिने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून, वाढत्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


यंदाच्या दिवाळी बाजारपेठेत विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंना मागणी आहे. रंगीबेरंगी आकाशकंदील, मातीच्या पणत्या, एलईडी दिव्यांच्या माळा, रांगोळ्या, लक्ष्मीपूजेसाठी लागणारे साहित्य तसेच फुले आणि फळांच्या खरेदीला जोर आला आहे. लहान मुलांना आकर्षित करणारे आकाशकंदील आणि खेळण्यांचे स्टॉल्सही ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. महिला, पुरुष आणि लहान मुलांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत असून, संपूर्ण बेळगावची बाजारपेठ दिवाळीच्या उत्साहाने गजबजली आहे.



Recent Comments