खानापूर तालुक्यातील नंदगड येथील महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक कमलाकांत पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
के. व्ही. पाटील या नावाने परिचित असलेल्या कमलाकांत पाटील यांनी गेल्या 32 वर्षांच्या सेवाकाळात तालुका, जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू घडविले. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नंदगड येथील दुर्गादेवी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थी आणि चाहत्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


Recent Comments