दुष्काळ आणि पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्याचा आरोप अखंड कर्नाटक किसान संघाचे राज्य सरचिटणीस अरविंद कुलकर्णी यांनी केला.
विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेल्या भरपाई योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सांगितले. नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पीक हातचे गेल्याने शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना योग्य नुकसानभरपाई, आर्थिक मदत आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. राजकीय गणित बाजूला ठेवून दोन्ही सरकारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी आणि प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुरेशी भरपाई द्यावी, अशी मागणी अरविंद कुलकर्णी यांनी केली.


Recent Comments