धारवाड तालुक्यातील हारोबेळवडीनजीक राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.
या अपघातात नवलगुंद तालुक्यातील गुम्मगोळ येथील २७ वर्षीय संगमेश केदार जावूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा आत्येभाऊ, कित्तूरजवळील बसापूर येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

धारवाड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments