माजी मंत्री कागोडू तिम्माप्पा यांना २०२६ चा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

बेबिमठाचे डॉ. त्रिनेत्र महांत शिवयोगी स्वामीजी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, मंत्री रुद्रप्पा लमाणी आणि विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापूर यांनी तिम्माप्पा यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

कागोडू तिम्माप्पा यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक कामे केली. त्यांचे साधे राहणीमान आणि जनहिताची कार्यपद्धती आजच्या राजकारण्यांसाठी आदर्श असल्याचे डॉ. त्रिनेत्र महांत शिवयोगी स्वामीजी यांनी सांगितले.
कागोडू तिम्माप्पा यांना शतकपूर्तीचा सोहळा साजरा करण्याचे भाग्य लाभावे, अशी सदिच्छा चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी व्यक्त केली. तिम्माप्पा हे आपल्यासाठी गुरुतुल्य असून त्यांचे कार्य अनुकरणीय असल्याचे मंत्री रुद्रप्पा लमाणी यांनी सांगितले.
यावेळी दोन्ही मठांचे भक्त उपस्थित होते.


Recent Comments