बेळगाव जवळील हलगा-बस्तवाड रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत, या मागणीसाठी हलगा ग्रामस्थांनी जिल्हा पानाचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

बेळगाव-हलगा सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या हलगा-बस्तवाड रस्त्यावर दुचाकी आणि इतर वाहने अतिवेगाने धावत असल्यामुळे शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जैन स्मशानभूमी समोर, सुभाऊ सागर नगर कॉर्नर, कन्नड प्राथमिक शाळेसमोर, लक्ष्मी गल्लीचे पश्चिम टोक, न्यू गल्ली, बसवण्णा गल्ली आणि ओमकार नगर क्रॉस या प्रमुख ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

“हा विषय सार्वजनिक सुरक्षेचा आणि अत्यंत महत्त्वाचा असल्याने यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्यात येतील,” असे आश्वासन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. ग्रामस्थांच्या या मागणीला प्रशासन किती लवकर प्रतिसाद देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रसंगी एडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, स्नेहा घोरपडे लाड, गणेश भाविकट्टी, शरद देसाई, रामनाथ नलावडे, महेंद्र कांबळे आणि गुरुदेव मठपती उपस्थित होते.


Recent Comments