Raibag

कुडचीत मा साहेबा दर्ग्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ

Share

रायबाग तालुक्यातील कुडची येथे मा साहेबा दर्ग्याच्या नूतनीकरणासह सभाभवन उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

दर्गा हा सर्वधर्मीयांच्या ऐक्याचे प्रतीक असून त्याची परंपरा आणि सलोख्याचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवावा, असे मंत्री यू. टी. खादर यांनी सांगितले. दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी २ कोटी आणि सभाभवनासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अन्य मशिदींच्या विकासासाठीही लवकरच निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सिंचन सुविधा, ३ कोटी रुपये खर्चून आयबी इमारत, ऊस वाहतुकीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण आणि २० रुपयांत उपचार देणाऱ्या रुग्णालयाच्या सेवेचा उल्लेख केला. अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्याक समाजातील गरीब कुटुंबांसाठी ४०० घरे बांधण्यासह अल्पसंख्याक वस्त्यांना मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

आमदार महेंद्र तमन्नावर यांनी विविध निधीतून मतदारसंघातील बहुतांश जुन्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले. कुडचीतील सात मीटर रुंदीचा रस्ता नऊ मीटरपर्यंत रुंद करण्याची मागणीही त्यांनी केली. कोल्हापूरहून विमानाने जाण्याचे नियोजन असल्याने मंत्र्यांनी कार्यक्रमानंतर प्रस्थान केले.

Tags: