मधुमेहाचे निदान आणि नियंत्रण तपासण्यासाठी उगार लायन्स क्लबतर्फे सुमारे २०० जणांची मोफत एचबीए१सी रक्ततपासणी करण्यात आली.

क्लबचे अध्यक्ष डॉ. मोहन कटगेरी यांनी शिबिराची माहिती देताना सांगितले की, या शिबिरात प्रत्येकी ५०० रुपये खर्चाची तपासणी मोफत करण्यात आली. एचबीए१सी तपासणीमुळे मागील दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी समजते. मधुमेहाचे निदान आणि नियंत्रण तपासण्यासाठी ही चाचणी उपयुक्त असल्याचे डॉ. कटगेरी यांनी सांगितले.

तपासणी अहवालातील प्रमाणानुसार मधुमेहाची स्थिती समजते. नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमात कागवाड तालुका आयुष वैद्यकीय संघटनेचे सचिव डॉ. सुरेश कुंदरगी, उगार लायन्स क्लबचे सचिव आनंद कुंभार, खजिनदार प्राचार्य पी. बी. कुलकर्णी, सदस्य सचिन पोतदार, मनोज मालगत्ते, महादेव दानन्नवर, तपासणी केंद्राचे प्रमुख उमेश कल्लोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते आनंद सदलगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments