Kagawad

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकास समितीवर ज्योतिकुमार पाटील यांची नियुक्ती

Share

कागवाड येथील ज्योतिकुमार पाटील यांची सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकास समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

गुरुवारी उगार येथील आमदारांच्या कार्यालयात ज्योतिकुमार पाटील यांचा आमदार राजू कागे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ज्योतिकुमार यांचे वडील सिद्धगौडा पाटील यांनी अनेक वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. त्यांच्यानंतर ज्योतिकुमार पाटील यांनीही पक्ष संघटना आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि सेवेची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे आमदार राजू कागे यांनी सांगितले.

आयनापूर येथील विश्वनाथ नामदार गुरुजी यांनी या नियुक्तीबद्दल राज्य सरकार आणि आमदार राजू कागे यांचे आभार मानले. काँग्रेस पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांना योग्य पद देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कागवाड पीकेपीएसचे अध्यक्ष काका पाटील, उपाध्यक्ष पद्माकर करवे, सुधीर करवे, रमेश चौगुले, प्रकाश पाटील, चिदानंद अवटी, पवन पाटील, उदय खोडे, राजू लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: