State

स्काऊट्स अँड गाईड्सच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Share

भारतीय स्काऊट्स अँड गाईड्सच्या कर्नाटक विभागाचे प्रमुख पी. जी. आर. सिंधिया यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली.

बंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी झालेल्या या भेटीत राज्यातील स्काऊट्स अँड गाईड्सच्या उपक्रमांसह आगामी कार्यक्रम आणि संस्थेच्या विकासासंदर्भात चर्चा झाली. शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेच्या कार्यासाठी सरकारकडून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Tags: