State

केपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Share

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केपीएससीच्या परीक्षांच्या पूर्वतयारीचा गुरुवारी आढावा घेतला.

राज्यातील गॅझेटेड प्रोबेशनर्स पदांच्या भरतीसाठी केपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तयारीसंदर्भात गृहकार्यालय कृष्णा येथून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीला गृह तसेच माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव ए. एस. पोन्नण्णा, मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेंद्र कुमार कटारिया, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रश्मी महेश, पोलीस महासंचालक एम. ए. सलीम, बंगळूरचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह, कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव के. जी. जगदीश, कोषागार विभागाच्या आयुक्त डॉ. अरुंधती चंद्रशेखर, केपीएससीच्या सचिव ज्योती के., परीक्षा नियंत्रक एच. प्रसन्न यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: