बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या अलकनूर गावातील करिसिद्धेश्वर मठाचा लाडका हत्ती ध्रुवराजा याचे आज सकाळी निधन झाले. या गजराजाच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी मठात आणलेल्या, भाविकांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या ध्रुवराजा हत्तीने आपल्या शांत स्वभावाने स्थानिक नागरिक आणि भाविकांशी अतुट नाते निर्माण केले होते. गेल्या काही दिवसांपासून तो आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर सतत उपचार सुरू होते, मात्र उपचारांना यश न आल्याने आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.

ध्रुवराजाच्या निधनाची बातमी समजताच अलकनूरसह आसपासच्या गावांत दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. मठाचे माहूत, भाविक आणि ग्रामस्थांनी ध्रुवराजाला साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली.


Recent Comments