वृद्ध पित्याला मुलांनी मारहाण करून घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सावसुद्दी गावात घडली आहे.
रायबाग तालुक्यातील सावसुद्दी येथील लक्ष्मण लक्कप्पा मांग (वय ८०) या वृद्धाने आपले मुलगे विठ्ठल मांग आणि गुरुपाद मांग यांच्याविरुद्ध मारहाण व दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. मुलांनी बेदम मारहाण करून दुखापत करत घरातून बाहेर काढल्याची तक्रार वृद्ध पित्याने केली आहे.

वयोवृद्ध काळात मुलांचा आधार नसल्याने हतबल झालेल्या लक्ष्मण मांग यांनी न्यायासाठी हारूगेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
घटनेसंदर्भात पोलीस तपास करत असून चौकशीअंती सत्य समोर येईल. हारूगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments