मतदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने दिल्लीतील विजय चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

देशात कोणत्याही परिस्थितीत बोगस आणि बेकायदेशीर मतांना परवानगी दिली जाणार नाही, तसेच पात्र मतदारांचा अधिकार हिरावून घेऊ दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील प्रत्येक कायदेशीर मतदाराच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, याविरोधात राज्यातील प्रत्येक क्षेत्रात जनजागृती मोहीम राबवली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेणे चुकीचे नसून, आयोगाने केवळ सत्ताधाऱ्यांच्या हिताचे रक्षण न करता निष्पक्षपणे काम केले पाहिजे, असे सांगतानाच मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत करून, उच्च पदावरून कोणालाही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन निवेदन सादर केले. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर पावले उचलली जावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


Recent Comments