चिक्कोडी – करोशी रस्त्यावर ढालायत शेताजवळ दुचाकी आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
वडगोळ येथील रहिवासी अमर सनदी मालवाहू वाहनातून बेंगळुरूहून चिक्कोडीच्या दिशेने जात होते. करोशी घाटातून उतरून ढालायत शेताजवळ येत असताना, चिक्कोडीहून करोशीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची मालवाहू वाहनाला धडक बसली. या अपघातात चिक्कोडीतील मेहबूब नगर येथील रहिवासी समीर शब्बीर मुल्ला हा तरुण गंभीर जखमी झाला.

स्थानिकांच्या मदतीने जखमीला तातडीने चिक्कोडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments