बेळगांव मधील प्रसिद्ध व नामवंत शाळा बिर्ला इंटरनॅशनल स्कूल व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून पूर्व विभागीय, पश्चिम विभागीय, उत्तर विभागीय, दक्षिण विभागीय व सेंटर विभागीय अश्या 28 राज्यातून,8 केंद्रशासित प्रदेश व 7 देशातून गल्फ विभागातील दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, यू ए इ, बहरीन, शारजा, येमेन आणि कुवेत येथून सुमारे 1200 च्या वर टॉप स्केटिंग स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धा दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर 2026 या दरम्यान शिवगंगा स्पोर्ट्स क्लब आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकवर होणार आहे तर रोड वरील स्पर्धा बी एस एन एल ऑफिस समोरील रोडवर होणार आहे बिर्ला इंटरनॅशनल स्कूल चे मनजीत जैन यांनी या स्पर्धेची तयारी पूर्ण केली असून या स्पर्धेसाठी 20 ऑफीशल त्याचबरोबर बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे 15 प्रशिक्षक, शाळे चे 20 शिक्षक 2 डॉक्टर 12 लोकाचा सपोर्ट स्टाफ कार्यरत असणार आहे.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर, बिर्ला इंटरनॅशनल चे शिक्षक व स्टाफ आणि ईतर अनेक जण परिश्रम घेत आहेत


Recent Comments