खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात केवळ १६ महिन्यांच्या अल्प कालावधीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे विभागीय शिक्षण अधिकारी पी. रामप्पा हे त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


मराठा मंडळ सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते. त्यांनी पी. रामप्पा यांच्या प्रामाणिकपणाची आणि विद्यार्थीप्रिय वृत्तीची प्रशंसा केली. ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरतबेल गावातील शाळा सुरू करणे, पीएम श्री व केपीएस शाळांचा दर्जा सुधारणे आणि अतिथी शिक्षकांची योग्य नियुक्ती करणे यात रामप्पा यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


चालू वर्षी तालुका राज्यात द्वितीय येण्यात आणि विद्यार्थिनी दिव्या देसाई राज्यात पहिली येण्यात त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत ठरल्याचे मान्यवरांनी नमूद केले. सत्कारानंतर पी. रामप्पा यांनी, जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला अधिक महत्त्व देऊन सेवेलाच कर्तव्य मानल्याची प्रतिक्रिया दिली आणि यशाचे श्रेय शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले. कार्यक्रमात बीआरसी मंजुनाथ हट्टी यांनी स्वागत केले, शंकर कमार यांनी प्रास्ताविक मांडले आणि विवेक कुरगुंद यांनी सूत्रसंचालन केले.



Recent Comments