hubali

हुबळीत भुयारी गटार कामादरम्यान भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

Share

हुबळी येथील देशपांडे नगरजवळील कृष्णा नगर परिसरात भुयारी गटाराचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळल्याने एका कामगाराचा ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झाला.

अपघात घडताच घटनास्थळावर असलेला जेसीबी चालक वाहन घेऊन पसार झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: