बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील चिक्कपडसलगी आरसी प्लॉट येथे अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर मल्लप्पा कब्बूर (२७) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.


सदर तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला असून घटनेची माहिती मिळताच सावळगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृताची आई बसव्वा कब्बूर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तोटलबागी गावातील रहिवासी मल्लव्वा, मल्लप्पा आणि अभिषेक या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सध्या या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सावळगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.


Recent Comments