hubali

हुबळीत दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांकडून अटक

Share

हुबळी आणि धारवाड शहरात विविध ठिकाणांवरून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात हुबळी शहर पोलिसांना यश आले आहे. संशयिताकडून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

बाबाजानी धारवाड असे अटक करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चोराचे नाव असून तो अमरगोळ येथील रहिवासी आहे. गेल्या २४ तारखेला शहरातील हर्ष कॉम्प्लेक्सजवळून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार हुबळी शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुश्ताक अहमद अली शेख यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी संशयित बाबाजानी याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने वेगवेगळ्या भागांतून एकूण ३ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी संशयिताकडून १ होंडा ॲक्टिव्हा, १ होंडा डीओ, १ टीव्हीएस, १ टीव्हीएस ज्युपिटर आणि १ सुझुकी ॲक्सेस अशा एकूण ५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Tags: