पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना हुबळी तालुक्यातील ब्याहट्टी गावातील शांतीनगर प्लॉट येथे घडली आहे.

फकीरप्पा ऊर्फ बसू अक्किबळ्ळी असे मृत पतीचे नाव असून, आरोपी प्रकाश करशेट्टी याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाशच्या पत्नीसोबत बसूचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी गावात दोन्ही बाजूंची समोपचार बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिल्याने काल रात्री संतापलेल्या प्रकाशने फकीरप्पा ऊर्फ बसूचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरगेश चेन्नण्णावर यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रकाशला ताब्यात घेतले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


Recent Comments