hubali

हुबळीत किरकोळ कारणावरून बेकरी व्यावसायिकावर हल्ला

Share

हुबळी मधील गणेश नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन ग्राहकांनी बेकरी व्यावसायिकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. खाद्यपदार्थ खरेदी करताना झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून जुने हुबळी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नुकत्याच घडलेल्या या घटनेत जुने हुबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर मधील पवन स्कूल जवळ असलेल्या मगवीर बेकरीमध्ये हा प्रकार घडला. बेकरीत खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांसोबत बेकरी व्यावसायिकाचा किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही ग्राहकांनी मिळून बेकरी व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीची संपूर्ण दृश्ये बेकरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही घटना जुने हुबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags: