Vijayapura

विजापूर जवळील तोरवी येथे भीषण रस्ते अपघात

Share

विजापूर मधील तोरवी गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शिक्षक दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नातेवाईकांकडील कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला असून विजापूर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विजापूर मधील तोरवी गावाजवळ रविवारी संध्याकाळी दुचाकी आणि ट्रक दरम्यान झालेल्या अपघातात शिक्षक दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. विजापूर तालुक्यातील खतीजापूर सरकारी शाळेतील शिक्षिका अंबव्वा पूजेरी आणि त्यांचे पती चाणक्य करिअर अकॅडमीचे शिक्षक गुरुलिंग हुणश्याळ असे मृत दांपत्याचे नाव आहे. तिकोटी येथील नातेवाईकांकडील कार्यक्रम संपवून दोघेही घरी परतत असताना हा अपघात घडला. विजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Tags: