मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस मंत्रिमंडळात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या ५ आमदारांना मंत्रिपद देण्यात यावे, या मागणीसाठी हुबळी आणि कुंदगोळ परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

कुंदगोळ शहरातील गाळी मरेम्मादेवी मंदिराच्या जवळ मुस्लिम बांधवांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येण्यामागे मुस्लिम समाजाचे तब्बल ८० टक्के मतदान कारणीभूत आहे, त्यामुळे आमच्या समाजातील आमदारांना मंत्रिमंडळात योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनादरम्यान, ज्येष्ठ नेते बी. झेड. झमीर अहमद खान यांना उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही करण्यात आली. या मागण्यांचे सविस्तर निवेदन कुंदगोळचे तहसीलदार राजू मावरकर यांच्यामार्फत राज्य सरकारला पाठवण्यात आले.



Recent Comments