Bagalkot

प्रा. भगवान यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा बागलकोटमध्ये तीव्र निषेध

Share

रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांच्याबाबत प्रा. के.एस. भगवान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा माजी खासदार व्ही.एस. उग्रप्पा यांनी बागलकोटमध्ये तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे वक्तव्य अक्षम्य असून, अशा प्रवृत्तींवर सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बागलकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्ही.एस. उग्रप्पा यांनी प्रा. भगवान यांच्या रामायणावरील बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र समाचार घेतला. रामायणाचा पूर्ण अभ्यास न करता अशी विधाने करणे लाजीरवाणे असून हा महर्षी वाल्मिकींचा अवमान आहे, असे ते म्हणाले. तसेच महात्मा गांधींच्या ‘रामराज्य’ संकल्पनेची आठवण करून देत त्यांनी भगवान यांना कडक इशारा दिला.

आर्थिक परिस्थितीवरून व्ही.एस. उग्रप्पा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. २०१४ पर्यंत देशावर ५२ लाख कोटींचे कर्ज होते, ते गेल्या दहा वर्षांत १६० लाख कोटींच्या पार गेल्याची टीका त्यांनी केली. केवळ रामाच्या नावाचा जप करणाऱ्या सरकारने आणि देशासाठी कोणतेही योगदान न देता समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: