बेळगाव तालुक्यातील होनगा औद्योगिक क्षेत्रातील एका सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या २० जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली असून काकती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी यासीन तहसीलदार, आरिफ शहापुरी, मोहम्मद जत्ती, मन्सूर बागवान, सर्फराज शहापुरी, फैझान मुजावर, शानूर मुचंडी, आरिफ मुल्ला, सुनील अष्टेकर, दस्तगीरसाब देसाई, वासीम मुजावर, अल्ताफ मुजावर, दस्तगीर मुल्ला, आरिफ काकतीकर, सकलीन तंबाखवाले, सिराज काझी, आतिफ सौदागर, प्रकाश बन्ने, गणपती केंशव्वगोळ आणि जहांगीर नाईक अशा २० जणांना अटक करण्यात आली आहे. काकती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Recent Comments