खानापूर येथील प्रतिष्ठित सर्वोदय विद्यालयात नवीन शालेय संसदेची स्थापना आणि पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.


शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी आणि त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्राथमिक विभागातील ७४ आणि माध्यमिक विभागातील १३३ अशा एकूण २०७ नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना शालेय संसदेचे सदस्य म्हणून शपथ देण्यात आली.


शाळेचे प्राचार्य फादर नेल्सन पिंटो यांनी नवनियुक्त बाल खासदारांना पदाची शपथ दिली. लोकशाही व्यवस्थेची माहिती विद्यार्थी दशेपासूनच असणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी उत्तम नेतृत्वगुण विकसित करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्याला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.


Recent Comments