खानापूर तालुक्यातील रुग्णांच्या हाकेला ओ देऊन वैद्यकीय सेवा देणारे आणि रुग्णसेवा हीच कर्तव्य मानणारे डॉक्टर नारायण ओड्डिनवर यांचा राष्ट्रीय वैद्यकीय दिनानिमित्त साई सेवा समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.


डॉ. नारायण ओड्डिनवर यांची हिरेबागेवाडी येथे बदली झाल्यानंतरही त्यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने स्थानिक नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. नारायण ओड्डिनवर यांनी वैद्यकीय व्यवसाय हा अत्यंत पवित्र असल्याचे सांगितले. समाजात लोक डॉक्टरांवर विश्वास ठेवतात; त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे काम करून तो विश्वास टिकवून ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले. आगामी काळातही सर्वांना सोबत घेऊन गरजू रुग्णांची सेवा करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला साई सेवा समितीचे पदाधिकारी आणि प्रमुख नागरिक उपस्थित होते.

अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज खानापूर


Recent Comments