Uncategorized

सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Share

आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल फोनच्या विळख्यातून बाहेर पडून ज्ञानाचा दिवा असणाऱ्या पुस्तकांच्या वाचनाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक साजिद शेख यांनी केले आहे.

बेळगाव शहरातील सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये आयोजित ‘मोबाईल सोडा, पुस्तके द्या’ या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि त्यांच्या भविष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकप्रेमी वृत्ती वाढवण्याचा सल्ला दिला.

याच कार्यक्रमात शाळेचे प्रमुख रेव्हरंड एरिक मॅथ्यूज यांनी साजिद शेख यांच्या निरंतर समाजसेवेचे कौतुक करून संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार केला. या प्रेरणादायी कार्यक्रमाला शाळेचे वरिष्ठ शिक्षक तारूक यांच्यासह शिक्षक कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: