राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून बेळगावातील बापट गल्ली येथील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बापट गल्ली परिसरात आयोजित या विशेष समारंभात, गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्यंत आपुलकीने सेवा देणारे डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या डॉ. सुरेश रायकर यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना मंडळाचे महेश पावले यांनी डॉ. रायकर यांच्या वैद्यकीय कौशल्याची आणि सेवाभावी वृत्तीची प्रशंसा केली.
यावेळी श्री कालिकादेवी युवक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते सुनील केसरकर, अंकुश केसरकर, अभि निलाजकर, भाऊ किल्लेकर, अतुल केसरकर, महेश पावले, धनंजय कणबरकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments