केंद्र सरकारचा अत्यंत मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल केएलई काहेर अभिमत विद्यापीठाच्या वतीने संस्थेचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे आणि आशाताई कोरे यांचा बेळगावात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे उद्घाटन आणि स्वागत करताना कुलसचिव डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी यांनी सत्कारपत्राचे वाचन केले. डॉ. कोरे यांच्या दूरदृष्टीच्या नऊ दशकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक नेतृत्वाचा यावेळी गौरव करण्यात आला. या ऐतिहासिक सन्मानाबद्दल संपूर्ण केएलई परिवाराने डॉ. कोरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभाकर कोरे कमालीचे भावूक झाले होते. हा सर्वोच्च बहुमान माझा एकट्याचा नसून, गेल्या ११० वर्षांपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अविरत श्रम करणाऱ्या संपूर्ण केएलई परिवाराचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला नैतिकतेने सेवा करण्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव आणि ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एच. बी. राजशेखर यांनी डॉ. कोरे यांच्या जीवनभराच्या कामगिरीला राष्ट्रीय अभिमान असल्याचे सांगितले.
या सोहळ्याला केएलई संस्थेचे अध्यक्ष शिवानंद कौजलगी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, उपाध्यक्ष बसवराज तटवटी, सचिव डॉ. एस. एस. जलालपुरे यांच्यासह एम. के. कवटगीमठ, जयानंद मुनवल्ली, डॉ. व्ही. आय. पाटील, वाय. एस. पाटील, प्रवीण बागेवाडी, डॉ. प्रीती दोडवाड आणि एम. सी. कोल्ली उपस्थित होते. परीक्षा नियंत्रक डॉ. चंद्र मेटगुड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. कर्नल एम. दयानंद, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. आर. एस. मुधोळ, डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. अशोक गोधी, डॉ. एन. एस. महांतशेट्टी, डॉ. बी. एस. प्रसाद यांच्यासह मोठ्या संख्येने वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments