Uncategorized

बागलकोट येथे कृष्णा नदीच्या पुलावरून टिप्पर नदीत कोसळला; चालकाचा मृत्यू

Share

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुका आणि विजापूर जिल्ह्यातील कोलार दरम्यान असणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलावर एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. एका कारला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेला टिप्पर थेट पुलावरून नदीत कोसळला असून, या अपघातात टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गद्दनकेरी येथून कोल्हारच्या दिशेने जाणारा टिप्पर कृष्णा नदीच्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या पुलावरून जात असताना हा अपघात घडला. पुलावरून जात असताना टिप्परने समोरील कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टिप्पर पुलाचे संरक्षक कठडे तोडून थेट नदीत कोसळला.

या अपघातात टिप्पर चालक संतोष याचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर टिप्परमधील क्लिनर संजू हा गंभीर जखमी झाला असून सुदैवाने या अपघातातून त्याचा जीव वाचला आहे. नदीत कोसळलेला टिप्पर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.

Tags: