कडी – कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना खानापूर शहरातील मारुती नगरमध्ये घडली.
भारतीय लष्करात कार्यरत असलेले बसवंत निलजकर हे सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह यडोगा या मूळ गावी गेले होते. हि बाब हेरून चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील 10 तोळे सोने, 20 तोळे चांदी आणि 5 हजार रुपये घेऊन पळ काढला असून या प्रकरणी खानापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Recent Comments