Belagavi

पाच्छापूरमध्ये ५ कोटींचे सुसज्ज आयबी भवन

Share

यमकनमर्डी मतदारसंघातील पाच्छापूर येथे ५ कोटी रुपये खर्चून सुसज्ज आयबी भवन उभारण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात प्रशासकीय सुविधांची भर पडली आहे.

हुक्केरी तालुक्यातील पाच्छापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हुक्केरी उपविभागामार्फत लेखाशीर्ष ४०५९ अंतर्गत हे भवन बांधण्यात आले आहे. क्षेत्रभेटीवर येणारे सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासाची तसेच बैठका व शासकीय कामकाजाची सोय या भवनामुळे होणार आहे.

ग्रामीण भागातही दर्जेदार शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाच्छापूरसह यमकनमर्डी मतदारसंघाच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.

Tags: