Bagalkot

मुधोळमध्ये ऊसदरासाठी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

Share

ऊसदराच्या मागणीसाठी मुुधोळ येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू राहिले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

संगोळ्ळी रायण्णा चौकातून तालुका प्रशासन कार्यालयापर्यंत काढलेल्या या रॅलीत शेतकऱ्यांनी प्रति टन उसाला ४,२०० रुपये दर आणि राज्य सरकारने तातडीने एसएपी लागू करण्याची मागणी केली. सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.

ऊसदर निश्चित करण्यात सरकार आणि साखर कारखानदार अपयशी ठरल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केला. अधिकृत दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Tags: