मुंबईतील प्रतिष्ठित कलादालनात बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार महेश होनुले यांच्या चित्रप्रदर्शनाला उत्साहात सुरुवात झाली. विविध निसर्गरम्य ठिकाणांचे सौंदर्य चित्रांमधून साकारण्यात आले असून, कलाप्रेमींसाठी हे प्रदर्शन आकर्षण ठरत आहे.

मुंबईतील ‘काला घोडा द आर्ट एन्ट्रन्स गॅलरी’ येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कारविजेते सर्जनशील चित्रपट दिग्दर्शक दीपक एस. व्ही. आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या हस्ते झाले.

१६ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यामध्ये जलरंग आणि अॅक्रेलिक माध्यमातून साकारलेल्या ३० हून अधिक आकर्षक चित्रांचा समावेश आहे. विशेषतः कोकण, बेळगाव, नेपाळ, हंपी, शिमला, गोवा आणि बदामी येथील निसर्गरम्य दृश्ये चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून सुंदरपणे साकारली आहेत.


Recent Comments