जमखंडी शुगर्स लिमिटेड आणि आनंद सिद्धू न्यामगौडा यांच्यात कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचे कंपनीच्या संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यांच्याशी कोणताही व्यवहार केल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची स्वतःची असेल, असे कंपनीने जाहीर सूचनेद्वारे कळविले आहे.

जमखंडी शुगर्स लिमिटेडच्या वतीने कार्यकारी संचालक राजीव कडपट्टी आणि संचालक राजेंद्र बी. पाटील यांनी ही जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. आनंद सिद्धू न्यामगौडा यांचा कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही क्षमतेत कंपनीशी संबंध नसल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनीच्या वतीने काम करीत असल्याचा दावा करणाऱ्या आनंद न्यामगौडा यांच्याशी कोणी व्यवहार केल्यास त्याची संपूर्ण जोखीम आणि जबाबदारी संबंधित व्यक्तींची असेल. अशा व्यवहारांतून होणारी कोणतीही कृती, देयके किंवा आर्थिक व्यवहार यांसाठी भविष्यात जमखंडी शुगर्स लिमिटेड कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, असा स्पष्ट इशाराही संचालक मंडळाने दिला आहे.


Recent Comments