Dharwad

वीज दरवाढीविरोधात भाजप महिला मोर्चातर्फे हुबळीत निदर्शने

Share

भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सरकारच्या वीज दरवाढीविरोधात निदर्शने करत या निर्णयाचा निषेध केला.

राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरमहा दोनशे युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करून निवडणुकीनंतर मात्र वीज बिलाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हुबळी येथे आज आंदोलन छेडले.
हुबळी येथील सीबीटी बसस्थानकाजवळ महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारने गॅरंटी देऊन मते मिळवली. पण आता लोकांचे खिसे कापण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप निदर्शक कार्यकर्त्यांनी केला. एकीकडे मोफत वीज देऊ करताना सरकारने विजेच्या दरात वाढ केली आहे. निदर्शकांनी सिद्धरामय्या यांच्या विरोधात “डाऊन डाउन सिद्धरामय्या डाउन” असा नारा देऊन आपला संताप व्यक्त केला.

Tags: