Belagavi

एसी कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात

Share

बेळगावच्या उपविभागाधिकारी (एसी) कार्यालयातील दुय्यम श्रेणी सहाय्यकाला लाच स्वीकारताना लोकायुक्तांनी रंगेहात पकडले. एसी न्यायालयात प्रकरणे वर्ग करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

एसी कार्यालयातील दुय्यम श्रेणी सहाय्यक पद्माकर पाटील यांनी तक्रारदार शुभम अप्पाराव यांची ३७ प्रकरणे एसी न्यायालयात वर्ग करण्यासाठी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत शुभम अप्पाराव यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दोन हजार रुपयांची आगाऊ लाच स्वीकारताना पद्माकर पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

Tags: