बेळगाव जिल्ह्यातील केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सीजीएचएस वेलनेस केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावमध्ये तातडीने केंद्रीय सरकारी आरोग्य योजना अर्थात सीजीएचएस वेलनेस केंद्र सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

राज्यातील काही महत्त्वाच्या भागांत लाभार्थ्यांची संख्या कमी असूनही सीजीएचएस सुविधा उपलब्ध आहे. मात्र, बेळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजारांहून अधिक लाभार्थी असूनही त्यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आजारपणाच्या काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले.


Recent Comments