बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील भू-रूपांतरण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे मानद अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी केली आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमण्याची मागणी त्यांनी केली.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गडाद यांनी, कर्नाटक सरकारच्या राजपत्रातील अधिसूचना आणि परिपत्रकांचे उल्लंघन करून बुडा क्षेत्रातील सुमारे २८ गावांमधील ७४३ एकर कृषी जमिनींचे विविध कारणांसाठी भू-रूपांतरण करण्यात आल्याचा आरोप केला. स्थानिक नियोजन प्राधिकरणाला विश्वासात न घेता नियमबाह्य अटी घालून हे आदेश काढण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित भू-रूपांतरण आदेशांना स्थगिती द्यावी. तसेच या प्रकरणात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही भीमाप्पा गडाद यांनी केली.


Recent Comments