Bagalkot

बागलकोटमध्ये बस, दूध दरवाढीविरोधात केआरएसचा एल्गार!

Share

राज्य सरकारने केलेल्या बस प्रवास भाडेवाढ आणि दूध दरवाढीच्या निर्णयाविरोधात बागलकोट येथे केआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

बागलकोट शहरातील जुन्या आरटीओ चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ताशा वाजवत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध करण्यात आला.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त आहे. त्यातच बस प्रवास आणि दुधाच्या दरात वाढ करून सरकारने सामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे, अशी टीका आंदोलकांनी केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर दरवाढीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आले.

Tags: