Dharwad

कचऱ्याला लावलेल्या आगीत मिनी गुड्स वाहन जळून खाक

Share

धारवाड येथील छत्रपती शिवाजी चौकाजवळ कचऱ्याला लावलेली आग मिनी गुड्स वाहनापर्यंत पोहोचल्याने वाहन जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील दुसरे वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचले.

छत्रपती शिवाजी चौकातील कॉटन मार्केट परिसरात ही घटना घडली. दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाहनाशेजारील कचऱ्याला आग लावण्यात आली होती. ही आग पसरून मिनी गुड्स वाहनाला लागली आणि काही वेळातच वाहन जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच वाहनाशेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या गुड्स वाहनाला आग लागण्यापासून वाचवले. ही घटना धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: