धारवाड-गोवा रस्त्यावर अळणावरजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
या अपघातात हुबळी तालुक्यातील सुळ्ळ गावचा दयानंद शिवळ्ळीमठ (२५) याचा मृत्यू झाला. दयानंद अळणावरहून धारवाडच्या दिशेने जात होता, तर कार धारवाडहून अळणावरकडे येत होती. यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

धडकेच्या तीव्रतेमुळे दयानंद गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी अळणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments