Accident

नुग्गीकेरे येथे कार आणि दुचाकीचा अपघात : महिलेचा जागीच मृत्यू

Share

धारवाडमधील नुग्गिकेरी येथे कार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीवरून प्रवास करणारी महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

या अपघाताचे नेमके कारण आणि मृत महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Tags: