विजापूर येथील सिद्धसिरी सौहार्द सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत केंद्रीय निबंधक कार्यालयाने स्पष्टीकरण मागवल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, संस्थेच्या कायदेशीर सल्लागारांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ अध्यक्ष आणि त्यांचे पुत्र रामनगौडा पाटील चेअरमन असलेल्या या संस्थेच्या आर्थिक अहवालाची तपासणी करून ११ मुद्द्यांवर खुलासा मागितल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः चिंचोळी शुगर्स आणि बायो इंडस्ट्रीजशी संबंधित व्यवहार व मालमत्ता खरेदीबाबत यत्नाळ विरोधकांनी हे पत्र व्हायरल केले असून समर्थकांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या नोटिसीला संस्थेने सप्टेंबरमध्येच लेखी उत्तर दिले असून, सहव्यवस्थापकीय संचालक आणि अंतर्गत लेखापरीक्षकांनी प्रत्यक्ष हजर राहून खुलासा केला आहे. चिंचोळी शुगर्समध्ये संस्थेने कोणतीही गुंतवणूक केलेली नसून, संस्था स्वतःचा कारखाना उभारत आहे. संस्थेवर कोणतीही आयटी किंवा ईडीची छापेमारी झालेली नाही, केवळ राजकीय हेतूने अपप्रचार सुरू असल्याची प्रतिक्रिया कायदेशीर सल्लागार सतीशचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
एकंदरीत, संस्थेचे स्पष्टीकरण आणि व्हायरल पत्रावरून या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, संबंधित विभागाच्या अधिकृत भूमिकेनंतरच यातील सत्य समोर येणार आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर


Recent Comments